संस्थेबद्दल :
पुणे ही विद्येची माहेरनगरी. पुण्यामध्ये नोकरी व उद्योगाच्या निमित्ताने विविध जाती धर्माचे लोक येऊन सुखाने राहत आहेत.
यामध्येच आपल्या जंगम समाजतील लोकही खूप आहेत. तेही राज्याच्या व देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून इथे आले आहेत.
त्यांना संघटित करणे, त्यांच्या समस्या जाणून योग्य ती मदत करणे व समाजाची उन्नती करणे या हेतूने सन २०१४ साली
श्री. ष. ब्र. १०८ निलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर) व श्री. ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महाराज (वाईकर) यांच्या
शिवाशीर्वादाने, वीरमाहेश्वर जंगम संस्था, पुणे (VMJS) ची स्थापना करण्यात आली. जंगम समाजातील तसेच इतर
समाजच्या लोकांनी दिलेल्या सहकार्य व योगदानामुळे संस्थेने अल्पावधीतच आपल्या कार्याचा मेरू चौफेर उधळला.
संस्थेचे वधु-वर मेळावा व जंगम परिवार डायरी हे उपक्रम सर्व लोकांनी नावाजले. संस्थेकडून दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय
कार्य करणाऱ्या लोकांना अखिल भारतीय पातळीवर वीरमाहेश्वर भूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या पुढील कार्यास प्रोत्साहन दिले जाते.
तसेच VMJS च्या व्हाट्सऍप ग्रुप च्या माध्यमातून समाजातील युवा पिढीला नोकरी व उद्योगासाठी लागणारी सर्व माहिती व
मदत पुरवली जाते. समाजातील लोकांमधील अंगीभूत गुणांना वाव देण्यासाठी वीरमाहेश्वर कल्चरल क्लबची स्थापना सन २०१७
साली करण्यात आली, ज्याच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा आस्वाद दिला जातो. या संस्थेरूपी छोट्याश्या रोपट्याला
वटवृक्ष बनवून त्याच्या सावलीचा आनंद आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी आमच्या सोबत या हीच विनंती. धन्यवाद.